ट्विटरमधील कर्मचारी कपात होणार असल्याचे वृत्त मस्क यांनी फेटाळले

सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – जगातील सर्वांत श्रीमंत अब्जाधीश आणि आता ट्विटरचे मालक असलेले इलॉन मस्क यांनी ट्विटरमधील कर्मचारी कपातीचे वृत्त खोटे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने ‘१ नोव्हेंबरपूर्वी ट्विटरमधील काही कर्मचार्‍यांना नोकरीवरून कमी केले जाईल’, असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मस्क यांनी स्वत: ट्वीट करून हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरची धुरा हाती घेतल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली होती.