नागपूर येथे मोक्का लावलेल्या बंदीवानाकडे गांजा आणि भ्रमणभाषच्या १५ बॅटर्‍या सापडल्या !

यामध्ये निश्‍चित बंदोबस्तातील पोलीस अथवा बंदीवानाला भेटायला येणारे त्याचे नातेवाईक यांचा सहभाग असू शकतो. कारागृहातील बंदीवानांकडे लक्ष ठेवू न शकणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा !  

श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्‍वर जगदगुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्यजी, समर्थ माऊली सरकार यांनी अमरावती येथे गणेशोत्सवानिमित्त चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना, गणेश महायाग, तसेच भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले होते.

आयकर विभागाकडून १०० ठिकाणी एकाच वेळी धाडी !

उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ५३ हून अधिक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.

भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून नियुक्त

४२ वर्षीय सुएला यांनी यापूर्वी ब्रिटन सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. याआधी त्या बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल म्हणून कार्यरत होत्या.

कोल्हापूर महापालिकेच्या कृतीमुळे हिंदूंच्या देवतेचा अवमान ! – नितेश राणे, आमदार, भाजप

कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला  अनुमती नाकारली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हेरॉईन आणि अफू यांचा साठा केला जप्त

पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.

चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्‍यांनाही आता सीट बेल्ट अनिवार्य !  

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्‍या प्रवाशांना ‘सीट बेल्ट’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी ‘सीट बेल्ट’ लावण्याविषयी सतर्क करणारी प्रणालीदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.