श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा !  

संत संमेलन

अमरावती – जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्‍वर जगदगुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्यजी, समर्थ माऊली सरकार यांनी अमरावती येथे गणेशोत्सवानिमित्त चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना, गणेश महायाग, तसेच भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले होते.

श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्‍वर जगदगुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्यजी

या संत संमेलनात देशभरातून विविध संत महंत सहभागी झाले आहेत. स्वतः स्वामीजींनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे ते व्यासपिठावर उपस्थित होते.

शंखनाद करताना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सकाळी निघालेल्या शोभायात्रेचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुष्पवृष्टी आणि शंखनाद करून स्वागत करण्यात आले.