गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला ! : सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीचे प्रकरण

सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला आहे.

उत्तरप्रदेशात बुलडोझरने रस्त्याच्या चौपदरीकरणात बाधा बनलेली मजार पाडली !

या प्रसंगात जर हिंदूंचे मंदिर असते आणि विरोध करणारे साहजिकच हिंदू असते, तर त्यांच्याविरोधात भारतभरातील धर्मनिरपेक्षतावादी जमातीने टीकेची झोड उठवून ‘विकासविराधी’ म्हणत त्यांना हिणवले असते.

गडचिरोली येथे खराब रस्त्यामुळे ८ मासांच्या आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील बर्‍याचशा ग्रामीण भागांत अजूनही रस्ते बनवले न केले जाणे हे सर्वपक्षियांना लज्जास्पद !

याकूब मेमनच्या कबरीविषयी वाद; परंतु औरंगजेब आणि अफझलखान यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न प्रलंबितच !

छत्रपती शिवरायांच्या काळात महाराष्ट्रावर आक्रमण करणारे औरंगजेब आणि अफझलखान या अतिरेक्यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे.

नवरात्रोत्सवात भाविकांना २०० रुपये देऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन चालू करण्याचा देवस्थान समितीचा विचार !

पैसे देऊन देवतेचे दर्शन चालू करणे हे इतरांवर अन्यायकारक नव्हे का ? ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेले आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा !

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या सशुल्क दर्शनास आमचा विरोध ! – हिंदु युवा प्रतिष्ठान

भाविकांना सशुल्क दर्शन आकारल्याने देवीच्या भक्तांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे दोन गट पडतील. त्यामुळे नवरात्रोत्सवात असलेल्या मंगलमय वातावरणात अडथळा निर्माण होईल.

ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी आतंकवाद्यांचे आक्रमण !

भारताने कॅनडाकडे केवळ तीव्र शब्दांत निषेध नोंदवून गप्प न बसता त्याला समजेल अशा भाषेत त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित !

आसाममध्ये ख्रिस्ती तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची चर्चच्या कार्यकर्त्यांकडून हत्या !

‘ख्रिस्ती म्हणजे शांततावादी’ अशी प्रतिमा भारतात निर्माण करण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात ती कशी आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते !

ज्ञानवापी प्रकरणी हिंदूंचा पक्ष ऐकल्याविना कोणताही निर्णय देऊ नये !  

ज्ञानवापी परिसरातील ३ मजारींवर चादर चढवण्यासह उरूस आदी अन्य धार्मिक कृती करण्याची अनुमती मागण्यात आली आहे.

(म्हणे) ‘मदरशांच्या सर्वेक्षणाची नोटीस घेऊन येणार्‍यांचे स्वागत चपलांनी करा !’

कायदा हातात घेण्याची चिथावणी देणार्‍यांवर सरकारने तात्काळ गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले पाहिजे !