कर्णावती  येथे उद्वाहन कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

इमारतीच्या ९व्या मजल्यावर काम चालू असतांना कामगार उद्वाहनातून साहित्य वरच्या मजल्यावर नेत होते. या वेळी ७ व्या मजल्यावर पोचताच उद्वाहन कोसळले.

नांदेड येथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ !

‘हैदराबाद मुक्तीसंग्राम दिना’च्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले होते. त्यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. ‘रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे’, अशी घोषणा विद्यार्थ्यांनी या वेळी केली.

इराणमध्ये हिजाब न घातल्याने पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर तरुणीचा संशयास्पद मृत्यू !

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘स्त्रीमुक्ती’ यांचा उदोउदो करणारी उपटसुंभ टोळी हिंदूंच्या मंदिरांत वेशभूषा अनिवार्य केल्यावर आकांडतांडव करते; परंतु हिजाब परिधान न करणार्‍या महिलांवर कारवाई करणारा इस्लामी देश इराणच्या विरोधात चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !

साजिद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्यात चीनचा अडथळा

देशातील आतंकवाद नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळा आणणार्‍या चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई होणे आवश्यक !

 ब्रिटनमध्ये ‘स्मार्टफोन’चा वापर करणारी ६५ टक्के मुले १९ व्या वर्षी होतात नैराश्यग्रस्त !

वैज्ञानिक उपकरणांचा अतिवापर केल्याचाच हा दुष्परिणाम ! अध्यात्मविहीन विज्ञानाचे उदात्तीकरण हेच या सर्व समस्यांना कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

 श्री दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकातामध्ये ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर पूजामंडप उभारणार

अन्य पंथीय कधी तरी स्वतःच्या सणाच्या वेळी इतर पंथियांच्या श्रद्धास्थानांचे उदात्तीकरण करतात का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये पिंजरे उघडून सोडले चित्ते !

आफ्रिका खंडातील नामिबिया देशातून आणण्यात आलेले ८ पैकी ३ चित्ते मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंजरे उघडून सोडले.

अझरबैजान-आर्मेनिया संघर्षावर तोडगा काढण्याचे भारताचे आवाहन

द्विपक्षीय संघर्षावर शांततेने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

‘जॉन्सन बेबी पावडर’चा परवाना कायमचा रहित !

‘जॅान्सन बेबी पावडर’चा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. या उत्पादनाच्या वापराने नवजात शिशू आणि लहान मुले यांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे.

संसदेत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात विधेयक मांडणार ! – डॉ. अनिल बोेंडे, खासदार, भाजप

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे, असे समस्त हिंदु जनतेला वाटते !