सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हेरॉईन आणि अफू यांचा साठा केला जप्त

चंडीगढ – पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी तस्करांवर गोळीबार केला; मात्र अंधाराचा अपलाभ उठवत ते पळून गेले. ‘पाकिस्तानी तस्करांनी भारताच्या शेतात हेरॉईनचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती सैनिकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सैनिकांनी सीमेला  लागून असलेल्या झांगड भैनी आणि रामसिंग वाली गावांमध्ये शोधमोहीम चालू केली होती’, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.