नवी देहली – आयकर विभागाने ७ सप्टेंबर या दिवशी देशभरात १०० ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी मद्य घोटाळा, माध्यन्ह भोजन, राजकीय निधी आणि करचोरी यांच्याशी संबंधित आहेत. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ५३ हून अधिक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.
इनकम टैक्स ने देशभर में एकसाथ 53 ठिकानों पर छापा मारा: राजस्थान में मंत्री के ठिकानों पर पहुंची टीमें; छत्तीसगढ़ में शराब और स्टील कारोबारियों पर एक्शन #IncometaxRaid https://t.co/U1hD95UvZm
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) September 7, 2022
दुसरीकडे बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचे कायदामंत्री मलय घटक यांच्या ६ ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सकाळी धाडी टाकल्या. घटक यांच्यावर कोळसा तस्करीचा आरोप आहे.