मालवण येथील ‘समुद्रकिनारा स्वच्छता यंत्रा’च्या चौकशीची मागणी करणार ! – विजय केनवडेकर, भाजप

समुद्रकिनारी शुभारंभ करण्यात आलेले ‘समुद्रकिनारा स्वच्छता यंत्र’ (बीच क्लिनिंग मशिन) ठेकेदारासाठी लाभदायक ठरत असून हे यंत्र म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे. त्यामुळे ‘या यंत्राविषयी चौकशी करावी’, अशी मागणी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे करण्यात येईल.

टी. राजा सिंह यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रयत्न !

टी. राजा सिंह यांना अटक केल्याच्या प्रकरणी ४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बैठक आयोजित केली होती.

तब्बल ५ सहस्र चारचाकी वाहने चोरणार्‍या अनिल चौहानला अटक !

‘चौहान याने पोलिसांशी संगनमत करून एवढ्या हत्या आणि असंख्य चोर्‍या केल्या का, याचे अन्वेषणही व्हायला हवे’, अशी मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राजकीय पक्षांकडून धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या होणार्‍या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सय्यद वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

देहली येथून १ सहस्र २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : दोघा अफगाणी नागरिकांना अटक  

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने दोघा अफगाणी नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून ३१२.५ किलोग्राम मेथामफेटामाईन आणि १० किलोग्राम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

देहलीतील ‘राजपथ’चे नाव आता ‘कर्तव्यपथ’ !

देहलीतील प्रसिद्ध ‘राजपथ’चे नाव पालटून त्याचे ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण केले जाणार आहे. इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा ते राष्ट्रपती भवन हा रस्ता ‘राजपथ’ या नावाने ओळखला जातो.

चीनमध्ये ६.६ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपामुळे ४६ जणांचा मृत्यू

चीनच्या सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला.

गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !

गणेशभक्तांनो, गणेश चतुर्थीच्या काळात तुम्ही श्री गणेशाची भक्तीभावे अन् धर्मशास्त्रानुसार सेवा केली. आता त्याचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याऐवजी, प्रसिद्धीसाठी पर्यावरण रक्षणाचा बनाव करणार्‍या नास्तिकांच्या हाती मूर्ती सोपवणार आहात का ?

बांगलादेशात हिंदूंच्या स्मशानभूमीच्या भिंती मुसलमानांनी पाडल्या !

बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असतांना भारत त्याविषयी बांगलादेशाला जाब विचारतांना दिसत नाही. ‘बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौर्‍यावर आल्या असून त्यांना याविषयी जाब विचारण्याचे धाडस भारत दाखवणार का ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींकडून ओणम् साजरा केला जात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून होत आहे प्रसारित !

मुसलमानांनी हिंदूंच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर किंवा हिंदूंनी मुसलमानांच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमे देण्यासाठी पुष्कळच उत्साही असतात; मात्र जेव्हा हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमणे केली जातात, तेव्हा मात्र ही प्रसारमाध्यमे या बातम्या टाळतात.