नागपूर – न्यायालयातील कारवाईनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात नेत असलेल्या मोक्काच्या बंदीवानाकडे ५१ ग्रॅम गांजा आणि भ्रमणभाषच्या १५ बॅटर्या आढळल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज कवळे याला ६ सप्टेंबर या दिवशी या संदर्भात परत गुन्हे नोंद केले. वर्ष २०१९ मध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरज याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच आहे. आरोपी सुरज कवळे याच्यावर दरोडा, चोरी, मारहाण आणि लूट अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कारागृहात नेतांना त्याच्याकडील कागदपत्रांच्या धारिका पडताळल्या असता त्यात आणि १५ भ्रमणभाषच्या बॅटर्या आढळून आल्या.
संपादकीय भूमिकाकारागृहातील एका बंदीवानाकडे गांजा आणि भ्रमणभाषच्या बॅटर्या येतात कुठून ? यामध्ये निश्चित बंदोबस्तातील पोलीस अथवा बंदीवानाला भेटायला येणारे त्याचे नातेवाईक यांचा सहभाग असू शकतो. कारागृहातील बंदीवानांकडे लक्ष ठेवू न शकणार्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे ! |