‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता अत्यंत निर्भीड आणि पारदर्शक ! – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार

‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे की, जे जगातील हिंदूंवर दैनंदिन होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अत्यंत निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे करत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी काढले.

चोडण बेटावरील श्री देवकीकृष्ण मंदिरापासून गोव्यातील उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी चालू करावी ! – चोडणवासियांची मागणी

ख्रिस्ताब्द १५४० ते ख्रिस्ताब्द १५६७ या कालावधीत हे दैवत मये गावातून माशेल येथे स्थलांतरित झाल्याची नोंद आढळते. चोडण बेटावरील सर्व नागरिकांचे श्री देवकीकृष्ण हे प्रमुख दैवत होते आणि आजही आहे.

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

‘होय हिंदूच’ संघटनेकडून ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ !

सिंहगडावर येणार्‍या काही पर्यटकांकडून गडावर मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी अपप्रकार झाल्याने गडाचे पावित्र्य भंग होते. अशा अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी ‘होय हिंदूच’ संघटनेकडून २४ जुलै या दिवशी ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ राबवण्यात आली.

भ्रष्टाचार्‍यांना दणका !

सर्वाेच्च न्यायालयाने ‘ईडी’च्या अधिकारांवर मोहोर उमटवून त्यांच्या धडक कारवाईचा मार्ग केवळ प्रशस्तच केला असे नाही, तर त्यास भक्कम बळही दिले आहे. या निकालामुळे ‘ईडी’ला आता कुणाचीही भीडभाड न बाळगता जनतेचा पैसा लाटणार्‍यांना बेधडकपणे कारागृहात डांबणे सहज शक्य होणार आहे.

सनातनच्या साधिका सौ. प्राजक्ता जोशी यांना पितृशोक

सनातनचे साधक श्री. संजय जोशी यांचे ते सासरे, तर संत पू. सौरभ जोशी यांचे ते आजोबा होत. सनातन परिवार दोन्ही जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

पन्हाळागड येथे पर्यटकांना मद्यपान करू देणार्‍या ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर एका झुणका-भाकरी केंद्रावर काही जणांच्या गटाने मद्यपान केले होते. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसारित झाला होता. याविषयी पोलिसांनी ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद केला आहे.

लोकसंख्यावाढ सामाजिक कि धार्मिक समस्या ?

लोकसंख्यावाढीमुळे मूलभूत सुविधा, तसेच सुरक्षा द्यायला शासकीय यंत्रणा अल्प पडतात. त्यामुळे समाजामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. त्याची परिणती म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये, शिक्षण, आरोग्यविषयक गोष्टींमध्येही भाववाढ व्हायला लागते.

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

या हत्येमागे जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे जिहादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

देशी गायींच्या संख्येत होत असलेली लक्षणीय घट चिंताजनक

वर्ष २०२० मध्ये एकूण गायीत भारतीय गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून त्याविषयी चिंता करण्याचे तर कुणाच्या लक्षातही येतांना दिसत नाही.