बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

परळी (जिल्हा बीड) – येथे एका महिलेचा ‘दुसरी मुलगी नको’ म्हणून अवैध गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणी परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.

सासरकडील दोघांनी एका डॉक्टरला हाताशी धरून विवाहितेचे गर्भलिंगनिदान केले. यात मुलगीच असल्याचे सिद्ध झाल्याने पती आणि सासू यांच्या सांगण्यावरून बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील एका डॉक्टराने हा गर्भपात केला आहे. (अवैध गर्भपात रोखू न शकणारे पोलीस प्रशासन ! – संपादक)