लोकसंख्यावाढ सामाजिक कि धार्मिक समस्या ?

नोंद 

नुकतेच संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३ मध्ये भारत हा लोकसंख्येच्या संदर्भात चीनला मागे टाकून संपूर्ण विश्वात सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र म्हणून क्रमांक १ वर असेल, तसेच लोकसंख्यावाढीचे कारण धर्म नव्हे, तर मागासलेपणा असेल. ही माहिती प्रत्येक भारतियाला विचार करून कृती करायला प्रवृत्त करणारी आहे. भारताचा विचार केल्यास सध्याच्या घडीला मागासलेपणा आणि धार्मिक कारण यांमध्ये कशाचा किती संबंध आहे ? हे ठरवणे थोडे अवघडच आहे. कारण कोणतेही असले, तरी समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे. यासाठी लोकसंख्यावाढीचा परिणाम मानवाच्या सामाजिक, मानसिक आणि व्यावहारिक जडणघडणीवर कसा होतो ?, याविषयी समजून घेणे आवश्यक आहे. लोकसंख्यावाढीमुळे मूलभूत सुविधा, तसेच सुरक्षा द्यायला शासकीय यंत्रणा अल्प पडतात. त्यामुळे समाजामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. त्याची परिणती म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये, शिक्षण, आरोग्यविषयक गोष्टींमध्येही भाववाढ व्हायला लागते. या सर्वांचा परिणाम म्हणून गुन्हे आणि चोरी यांचे प्रमाण वाढते.

हा एक भाग असला, तरी धर्मामुळे लोकसंख्यावाढ होण्याचा धोका कितपत आहे ? याचा विचार केल्यास धर्म हे कारणही आहे. येथे लोकसंख्यावाढीचे कारण ‘मागासलेपणा आहे’, असे सांगून या शब्दाच्या मागे जिहादी मानसिकता नाही ना ?, हे बघायला हवे. तसेच वर्ष २०४० पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पहाणार्‍यांचे तर हे कारस्थान नसावे ना ? कारण संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, हिंदूंची लोकसंख्या ५.७५ टक्क्यांनी घटली आहे, तर मुसलमानांची लोकसंख्या ४.४० टक्क्यांनी वाढली आहे. इतर धर्मियांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यात बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या घुसखोर यांची लोकसंख्या किती आहे ? हेही पाहिले पाहिजे.

कोणत्याही दृष्टीने ‘लोकसंख्यावाढ’ या समस्येकडे पाहिल्यास तिचे परिणाम सर्वांवर गंभीर होणार आहेत, हे नक्की ! धार्मिक दृष्टीने ही संख्या वाढल्यास तिचा प्रत्येक हिंदूवर होणारा परिणाम पुष्कळ प्रमाणात गंभीर आणि जीवघेणा असेल. त्यामुळे ‘आतातरी देशात समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक हिंदूला वाटते. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर जे अल्पसंख्यांक होते, ते बहुसंख्यांक होतील आणि वर्ष २०४० च्या त्यांच्या निर्धारित ध्येयाकडे वाटचाल करतील.

– श्री. जयेश बोरसे, पुणे