‘होय हिंदूच’ संघटनेकडून ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ !

पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त

मोहिमेला प्रारंभ करतांना ‘होय हिंदूच’ संघटनेचे कार्यकर्ते

पुणे, २७ जुलै (वार्ता.) – सिंहगडावर येणार्‍या काही पर्यटकांकडून गडावर मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी अपप्रकार झाल्याने गडाचे पावित्र्य भंग होते. अशा अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी ‘होय हिंदूच’ संघटनेकडून २४ जुलै या दिवशी ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत गडावर जाणार्‍या पर्यटकांची तपासणीही करण्यात आली. या तपासणीमध्ये पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात गांजा, मद्य, तंबाखू असे अमली पदार्थ जप्त करून पर्यटकांचे योग्य प्रबोधन करण्यात आले.

या मोहिमेला हवेली ग्रामीण पोलीस आणि वन विभाग यांचे सहकार्य लाभले. गडावर जातांना तपासणी चालू असल्याचे लक्षात आल्याने उपद्रव करणारे अनेक पर्यटक गडाच्या पायथ्यावरूनच माघारी फिरले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांना जाळून नष्ट करण्यात आले.

पर्यटकांकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ
सिंहगडावर येणार्‍या पर्यटकांकडून अमली पदार्थ जप्त केल्यानंतर जाळून नष्ट करण्यात आले

संपादकीय भूमिका

गड-दुर्ग रक्षकांचे अभिनंदन !

महाराष्ट्रातील गड – दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या.