मंगळुरू (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय साधनावृद्धी आणि कौशल्य विकास शिबिर पार पडले !

या शिबिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे जीवनातील महत्त्व, हिंदु राष्ट्राविषयी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मकार्य कसे करू शकतो, आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

माओवाद्यांचे पुढील लक्ष्य मुंबईतील झोपडपट्ट्या !

माओवाद्यांनी लक्ष्यपूर्ती करण्यापूर्वीच सरकारने माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी तत्परतेने पावले उचलावीत !

श्री रुक्मिणीदेवीच्या चरणांचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन !

विविध क्षेत्रांतील अडचणींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मंदिर हा हिंदु धर्माशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यांवरील उपायांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, म्हणजे शंकराचार्य, संत, धर्माचार्य आदींचे मार्गदर्शन…

सोलापूर येथे अन्न आणि औषध प्रशासनाने १ कोटी ३१ लाख रुपयांचा गुटखा जाळला !

१७ ठिकाणी संयुक्त कारवाई करून अन्न आणि औषध प्रशासनाने जप्‍त केलेला अनुमाने १ कोटी ३१ लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी यांचा साठा १४ जून या दिवशी जाळून नष्ट केला.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !

(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !

(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

पंढरपूरच्या ‘विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा शासकीय निवासस्थानी १० जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

राज्य विक्रीकर विभागाचे लाचखोर साहाय्यक राज्यकर आयुक्त कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !