सोलापूर – १७ ठिकाणी संयुक्त कारवाई करून अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलेला अनुमाने १ कोटी ३१ लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी यांचा साठा १४ जून या दिवशी जाळून नष्ट केला. हा जप्त केलेला साठा दक्षिण सोलापूर तालुक्यातील ‘मे. कीर्ती ॲग्रोटेक, बोरामणी’ या आस्थापनाच्या आवारात मोकळ्या जागेत तालुका पोलीस ठाण्याचे पर्यवेक्षाधीन साहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.