ठाणे, १५ जून (वार्ता.) – कापूरबावडी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला त्याच्या हॉटेलचा नवीन जीएस्टी क्रमांक काढून देण्यासाठी, तसेच मागील वर्षाचे मूल्यांकन न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या राज्य विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय शिरसाट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)