पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’चे सभासद

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील पिंपळे गुरव येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने महिला आणि पुरुष यांनी एकत्र येऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. (जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत ! – संपादक) या वेळी हलगी वादकही उपस्थित होते. महिला आणि पुरुष यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. अशा प्रकारे गेल्या ७ वर्षांपासून पुरुष वटपौर्णिमा साजरी करत आहेत, असे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’चे संचालक आण्णा जोगदंड यांनी सांगितले.