(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

पुणे – वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो केवळ सुवासिनींचा सण नाही. माझे सगळ्या महिलांना आवाहन आहे की, ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावी वाटते, त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी. यात कोणीही भेदभाव करू नये, असे वक्तव्य ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी केले आहे.

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालनपोषण करण्याचा वटपौर्णिमेच्या दिवशी संकल्प करावा. जेणेकरून पर्यावरणाचेही आपल्याकडून संवर्धन होईल.

संपादकीय भूमिका

  • अध्यात्मशास्त्राचा अभ्यास नसतांना सण आणि व्रते यांविषयी बेताल वक्तव्य करणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणे !
  • शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !
  • तृप्ती देसाई, ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’ किंवा ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’, असे मानणारी विचारसरणी यांविषयी काही बोलण्याचे धाडस करतील का ?