मुंबई – मुंबईतील झोपडपट्ट्यांना लक्ष्य करण्याचे माओवाद्यांचे षड्यंत्र उघड झाले आहे. गुप्तचर यंत्रणांना याविषयीची महत्त्वाची माहिती माओवाद्यांकडील कागदपत्रांमधून मिळाली आहे. संघटना सिद्ध करण्यासाठी काही दशकांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे.
हिंदू कट्टरतावादी शक्तींना विरोध करण्यासाठी फ्रंट सिद्ध करण्याची माओवाद्यांची योजना आहे. मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख धर्मियांचा एकत्रित फ्रंट सिद्ध करण्याचा त्यांचा आराखडा आहे.
संपादकीय भूमिकामाओवाद्यांनी लक्ष्यपूर्ती करण्यापूर्वीच सरकारने माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी तत्परतेने पावले उचलावीत ! |