VIDEO : इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर संघर्ष करायला हवा ! – प.पू. यती चेतनानंद सरस्वती, महंत, डासना पीठ, गाझियाबाद, उत्तर प्रदेश

इस्लामी जिहादला घाबरून रडण्याऐवजी त्या विरोधात लढले पाहिजे. देहली येथे धर्मांधांनी घडवलेली दंगल, काश्मीरमध्ये हिंदूंच्या होणार्‍या हत्या, अशा अनेक घटना भारतात घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांच्या विरोधात निरंतर संघर्ष चालूच राहील.

VIDEO : सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! – पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक

जेव्हा धर्मावर अधर्म वरचढ झाला, तेव्हा भगवान परशुरामाने परशू धारण केला. अशा परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही तपस्या करण्याची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे.

धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मी जाती-धर्मांत भेदभाव करत नाही. कुणीही लोकांचे आमिषे दाखवून धर्मांतर करू शकणार नाही. यापुढे अशा कृत्यांना राज्यात अजिबात थारा दिला जाणार नाही, तरीही कुणी ऐकत नसेल, तर राज्यात धर्मांतरबंदी कायदा आणावा लागणार आहे.

VIDEO : ‘दुर्गांचे रूपांतर दर्ग्यात होऊ नये’, यासाठी हिंदूंनी संघटित कार्य करणे आवश्यक ! – मनोज खाडये, समन्वयक, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकात केवळ ६ मुलींच्या हिजाबवरून राष्ट्रीय आंदोलन उभे राहिले; मात्र कमलेश तिवारी, हर्षा यांसह कित्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याविरोधात भारतातील हिंदू शांत राहिले.

हिंदूंना अधोगतीला नेणारा सर्वधर्मसमभाव !

‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणाऱ्या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणाऱ्या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’

हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी श्री नागेश आणि श्री रामनाथ देवतांना हिंदुत्वनिष्ठांकडून प्रार्थना !

या वेळी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन, ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, देवस्थानचे सचिव प्रशांत केरकर, ॲटर्नी पंढरीनाथ बोडके आणि सनातन संस्थेचे श्री. नारायण नाडकर्णी उपस्थित होते.

अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागा मागणार !

अयोध्येत येणे ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. मी येथे राजकारण करायला नव्हे, तर दर्शन घ्यायला आलो आहे. अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी; म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.