साधकांना सूचना – दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली. (१६ जून २०२२)
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवांच्या प्रसारासाठी आवश्यक असलेले प्रसाराच्या साहित्याची कलाकृती (आर्टवर्क) नेहमीच्या संगणकीय ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.
‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
१२.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’ येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला आरंभ झाला. याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.
नामावर श्रद्धा ठेवा. नाम हाच तुमचा गुरु आहे. नामच तुम्हाला मार्ग दाखवील !
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४.१०.२०२१ या कालावधीत मुंबई जिल्ह्यात दौरा झाला. त्या वेळी त्यांच्या समवेत असणाऱ्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या संदर्भात कळले. दुसऱ्या दिवशी, ७.४.२०२२ ला सकाळी ५.४० वाजता त्यांना हिंदु राष्ट्र जागृती अभियानावर एक कविता सुचली. ती येथे दिली आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूची वेशभूषा केली होती. त्या वेळी ते परिधान करणार असलेले सोवळे, उपरणे आणि शेला यांना इस्त्री करण्याची सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
देहलीला पोचल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘पंचतत्त्वेच श्रीगुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) नियंत्रणात आहेत. ते कोणतीही परिस्थिती एका क्षणात पालटू शकतात’, असे यातून लक्षात येते.
‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्संग आणि त्यांच्या सहवासातील एकेक क्षण म्हणजे मोक्षक्षणच आहेत’, असा विचार येऊन माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली. तेव्हा ईश्वराने मला कृतज्ञतास्वरूप ही कविता भेट म्हणून दिली.