इयत्ता बारावीच्या निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर !

राज्यात कोकण विभाग ९७.२२ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ९६.५२ टक्के निकाल लागलेला नागपूर जिल्हा असून तिसऱ्या क्रमांकावर ९६.३४ टक्के मिळालेला अमरावती विभाग आहे.

मला घंटा बडवणारा हिंदु नको, तर आतंकवाद्यांना बडवणारा हिंदु हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणार आहे. संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वचन मी पूर्ण करणार आहे.

हिंदुहितैषी निर्णय स्वागतार्ह !

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !

अवैध गर्भपात प्रकरणातील संशयित आरोपी परिचारिकेची आत्महत्या !

२ दिवसांपूर्वी अवैध गर्भपात करतांना महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ५ जणांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) तालुक्यातील कुशिवली धरण भूसंपादनात झाला कोट्यवधींचा घोटाळा !

प्रस्तावित कुशिवली धरणाच्या भूसंपादनात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आतापर्यंत ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती प्रवीण भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे.

संभाजीनगर येथे अवैध नळ घेणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश !

यावरून महापालिका अधिकाऱ्यांचे अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांशी लागेबंधे आहेत का ? याची पडताळणी करून दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.

न्यायालयाच्या आवारात पिस्तुलातून गोळ्या झाडल्याच्या घटनेने शिरूरमध्ये खळबळ !

गुन्हेगारांना पोलिसांचा वचक न राहिल्याचे उदाहरण ! न्यायालयाच्या आवारात अशा घटना घडणे, हे सुरक्षायंत्रणेला लज्जास्पद नव्हे का ?

संभाजीनगर येथे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास अटक !

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज घेतल्याचा घोटाळा वर्ष २०२१ मध्ये झाला होता. यात बँकेच्या वतीने मुख्य ७१ शेतकऱ्यांना आरोपी करत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.

५ सहस्र रुपयांची लाच घेतांना विस्तार अधिकाऱ्याला अटक !

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता सूचीमध्ये  समावेश करून प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठवण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र रोटेवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्तांच्या लेखापरीक्षकांची मारहाण केल्याची तक्रार !

लेखापरीक्षक शुभम मंत्री म्हणाले की, एका विश्वस्ताने शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केला. याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना दिले असून तक्रारही केली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांच्या कोणत्याही व्यवहारात लेखापरीक्षकांचा कोणताही संबंध येत नाही.