न्यायालयाच्या आवारात पिस्तुलातून गोळ्या झाडल्याच्या घटनेने शिरूरमध्ये खळबळ !

दीपक ढवळे

टाकळी हाजी (पुणे) – शिरूर न्यायालयाच्या परिसरात दीपक ढवळे यांनी पत्नी आणि सासू यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्याने खळबळ उडाली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून सासू गंभीर घायाळ झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. ढवळे पती-पत्नीचा न्यायालयात लढा चालू होता. रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अन् त्यांचे सहकारी यांनी आरोपींला कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका 

गुन्हेगारांना पोलिसांचा वचक न राहिल्याचे उदाहरण ! न्यायालयाच्या आवारात अशा घटना घडणे, हे सुरक्षायंत्रणेला लज्जास्पद नव्हे का ?