भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !

माजलगाव (जिल्हा बीड) – ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता सूचीमध्ये समावेश करून प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठवण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र रोटेवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ जून या दिवशी अटक केली.
माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची सेवेची १० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांचा सेवा ज्येष्ठता सूचीत समावेश करून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी रामचंद्र रोटेवाड यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली होती.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !