संभाजीनगर येथे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज घेतल्याचा घोटाळा वर्ष २०२१ मध्ये झाला होता. यात बँकेच्या वतीने मुख्य ७१ शेतकऱ्यांना आरोपी करत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. पीक घोटाळ्यात ७१ आरोपींच्या व्यतिरिक्त ८ ते १० जणांना ग्रामीण पोलीसदलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहआरोपी केले आहे. यात एका चहा विक्रेत्याला पहिले आरोपी न करण्यासाठी येथील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब जमधडे यांनी त्याच्याकडे ३० सहस्र रुपयांची लाच मागितली. चहा विक्रेत्याने २५ सहस्र दिले; मात्र ५ सहस्र अल्प दिले; म्हणून आरोपीकडून पुन्हा उरलेले ५ सहस्र रुपये मागितले. त्यामुळे संतापलेल्या चहा विक्रेत्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ‘एसीबी’ने जमधडे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना ७ जून या दिवशी अटक केली.