ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

ख्रिस्ती धर्मांतराविषयी जागरूकपणे सनदशीर मार्गाने विरोध करणार्‍या ‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

जोपर्यंत भारत पाकव्याप्त काश्मीरवर सैनिकी कारवाई करून त्यास कायमस्वरूपी स्वत:च्या नियंत्रणात घेत नाही, तोवर पाक अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मीरमधील भूभाग चीनच्या घशात घालत रहाणार !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह नाल्यात सापडला !

बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने हत्या होत असतांना देशातील एकही राजकीय पक्ष तोंड उघडत नाही, जे दुसरीकडे राज्यघटनेच्या रक्षणाच्या बाता करत असतात !

ताजमहालची भूमी आमच्या घराण्याच्या पूर्वजांची !

राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूर यांच्या नात्याविषयीची नवीन माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, ताजमहालची भूमी ही आमच्या पूर्वजांची आहे. ही भूमी आमचा वारसा आहे.

कर्नाटकात अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केल्याने पाकचा जळफळाट !

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांना पाकमधील हिंदूंच्या वंशसंहाराविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली पाहिजे !

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावाकडून हत्या

मुसलमानांनी हिंदु तरुणीवर केले, तर ते ‘प्रेम’ आणि हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीवर प्रेम केले, तर तो ‘मुलीचा धर्मद्रोह’, अशा मानसिकतावाल्यांना कोण जाब विचारणार ?

कर्नाटक मंत्रीमंडळाची धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

विधेयक विधानसभेत संमत होईपर्यंत अध्यादेशाच्या स्वरूपात लागू होणार !

भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी !

‘श्री गणेशमूर्ती शाडूमातीची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी’, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेशाविषयी अभिनंदन !

रेल्वे मंत्रालयाकडून १९ अकार्यक्षम अधिकारी बडतर्फ !

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई
रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे शिस्तीकडे अधिक गांभीर्याने लक्ष