कर्नाटक मंत्रीमंडळाची धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

विधेयक विधानसभेत संमत होईपर्यंत अध्यादेशाच्या स्वरूपात लागू होणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती दिली. आता हे विधेयक विधानसभेत मांडला जाणार आहे. तेथे संमत झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे; मात्र तोपर्यंत हे विधेयक अध्यादेशाच्या स्वरूपात लागू करण्यात येणार आहे.

सरकारचे विधान परिषदेत बहुमत नसल्याने अध्यादेशाचा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे. येत्या जून मासात विधान परिषदेच्या निवडणुका आहे. त्यानंतर कदाचित् भाजपला येथे बहुमत मिळण्याची शक्यता आहे.