बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह नाल्यात सापडला !

भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप

मिदनापूर (बंगाल) – येथे भाजपचे कार्यकर्ते कृष्ण पात्रा यांचा मृतदेह येथील एका नाल्यामध्ये सापडला. कृष्ण यांची तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुझुमदार यांनी केला आहे. कृष्ण यांचे घरातून अपहरण करण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात यापूर्वी ६ मे या दिवशी भाजपचे कार्यकर्ते अर्जुन यांचा मृतदेह फाशी लावून घेतल्याच्या स्थितीत आढळला होता.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने हत्या होत असतांना देशातील एकही राजकीय पक्ष तोंड उघडत नाही, जे दुसरीकडे राज्यघटनेच्या रक्षणाच्या बाता करत असतात !