महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश
पुणे – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं बनवू नयेत, असा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला. या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे.
यापुढे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका‘श्री गणेशमूर्ती शाडूमातीची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी’, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेशाविषयी अभिनंदन ! |