मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावाकडून हत्या

राजकोट (गुजरात) – मुसलमान तरुणीशी प्रेम केल्यामुळे तिच्या भावाने हिंदु तरुणाला अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना येथे घडली. मिथुन ठाकूर (वय २२ वर्षे) असे मृत तरुणाने नाव आहे. त्याचे सुमैया कादिवर हिच्यावर प्रेम होते. यामुळे सुमैयाचा भाऊ साकिर याने त्याच्या ३ साथीदारांसह मिथुन याची हत्या केली. दुसरीकडे मिथुन याची हत्या करण्यात आल्याने सुमैया हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मिथुन मूळचा बिहारचा रहाणारा आहे. तो राजकोटमधील एका कारखान्यात काम करत होता. जंगलेश्‍वर मार्गावरील राधाकृष्ण सोसायटीमध्ये तो रहात होता. येथेच रहाणार्‍या सुमैयावर त्याचे प्रेम होते. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

संपादकीय भूमिका

याविषयी निधर्मीवादी बोलतील का ? मुसलमानांनी हिंदु तरुणीवर केले, तर ते ‘प्रेम’ आणि हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीवर प्रेम केले, तर तो ‘मुलीचा धर्मद्रोह’, अशा मानसिकतावाल्यांना कोण जाब विचारणार ?