ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवशी ४० टक्के सर्वेक्षण पूर्ण

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण १४ मे या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पूर्ण करण्यात आले. हे सर्वेक्षण ४० टक्केच पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण १५ मे या दिवशी पुन्हा करण्यात येणार आहे.

भारत सरकारकडून गव्हाच्या निर्यातीवर बंदी

गव्हाच्या वाढत्या किमती पहाता केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. एका अधिसूचनेत सरकारने म्हटले आहे की, देशाची अन्न सुरक्षा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

संपानंतर एस्.टी.च्या १३ सहस्र गाड्या सेवारत; प्रवाशांच्या संख्येत मात्र घट !

राज्य मार्ग परिवहन महामंडळात १५० इलेक्ट्रिक बस येणार !

भोकरदान (जिल्हा जालना) येथे छत्रपती शिवरायांची मूर्ती असणाऱ्या प्रवेशद्वाराला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यावरून दोन गटांत दगडफेक !

प्रवेशद्वाराचे नामकरण ‘गोपीनाथ मुंडे’ असे करण्यात येणार होते; मात्र या कारणावरून २ गटांत वाद होऊन एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.

नाशिक आणि पुणे येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ !

संघटितपणाचा संदेश देणाऱ्या या दिंडीत समाजातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘एम्.आय.एम्.’ची कृती कट्टरपंथी औरंगजेबासारखीच ! – चंद्रकांत खैरे, शिवसेना

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘एम्.आय.एम्.’च्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही ?

राष्ट्राच्या परमावधीच्या अधोगतीचे कारण

 ‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली  आहे.’