पेट्रोल आणि डिझेल राज्यामुळे महागले, ही वस्तूस्थिती नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सद्य:स्थितीत मुंबईत १ लिटर डिझेलच्या दरामध्ये २४.३८ पैसे केंद्राचा, तर २२.३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१.५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२.५५ पैसे राज्याचा कर आहे. राज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागले आहे, ही वस्तूस्थिती नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सोलापूर येथे जुन्या आणि नवीन भोंग्यांसाठी अनुमती घेण्याच्या पोलिसांच्या सूचना !

भोंग्यांसाठी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच अनुमती असेल. औद्योगिक, व्यापारी आणि निवासी क्षेत्रांसमवेतच शांतता क्षेत्रामध्ये ५० ते ७५ डेसिबलहून अधिक आवाज असू नये, तसेच मशिदींसह मंदिरांवरील जुन्या भोंग्यांना अनुमती घेऊन ते नियमित करावेत…

नागपूर येथे खासदार नवनीत राणा यांच्याकडून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार प्रविष्ट !

खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात २६ एप्रिल या दिवशी येथील पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीची तक्रार प्रविष्ट केली आहे. येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही लेखी तक्रार देण्यात आली आहे.

मनसेचे पदाधिकारी भोंगे खरेदी करून पहिल्या टप्प्यात मशिदींसमोरील मंदिरांवरच भोंगा वाजणार !

मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी चालू आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी घायाळ !

शिवछत्रपतींचे कार्य घराघरांत पोचवणे यासाठी अहोरात्र भ्रमण करणारे, तरुणांसह आबालवृद्धांसाठी आदर्श असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी गणपति पेठ येथील श्री गणपति मंदिराजवळ रस्त्यातील खड्ड्यांमुळे सायकलवरून पडून घायाळ झाले आहेत.

संभाजीनगर येथे महिला आयोगासमोर मांडल्या सर्वाधिक कौटुंबिक छळाच्या तक्रारी !

महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ?

बहुपत्नीत्व आणि सुधारणावाद !

लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी समान नागरी कायदा हा एक उत्तम उपाय असू शकतो. त्यामुळे या कायद्याला वेगवेगळ्या प्रकारे धर्मांध विरोध करत असतील, तर तो लवकरात लवकर अस्तित्वात येण्यासाठी हिंदूंनीही संघटित होऊन सरकारला तो आणण्यासाठी दबाव आणायला हवा.

उत्तरप्रदेश सरकारचे यश !

आक्रमक धर्मांधांना चुचकारून किंवा त्यांच्यासमोर मान तुकवून ते सुधारत नाहीत, तर त्यांच्या विरोधात तितक्याच आक्रमकपणे कायदा आणि नियम यांची कार्यवाही करून त्यांना वठणीवर आणता येते. हे उत्तरप्रदेश सरकारला जमल्यामुळे भोंग्यांमुळे भारतभरातील वातावरण ढवळून गेले असता उत्तरप्रदेशमध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हिंदूंसाठी मात्र हे सुखावह चित्र आहे.

समान नागरी कायदा झालाच पाहिजे !

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी असल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. बोर्डाचे महासचिव मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांनी म्हटले की, हा कायदा देशातील नागरिक स्वीकारणार नाहीत.

‘क्षमा वीरस्य भूषणम् ।’ याविषयी योग्य दृष्टीकोन !

व्यष्टी स्तरावर कुणी तुमच्यावर काही मानसिक आघात केला किंवा बोलून तुमचा तिरस्कार केला, तर तुम्ही त्याला अवश्य क्षमाच करायला पाहिजे; परंतु समष्टी स्तरावर वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून अत्याचार होत असेल, तर त्याला त्वरित कठोरातील कठोर दंड द्यावा; अन्यथा समाजात अधर्म वाढण्यास वेळ लागणार नाही.