गुरुकार्याची तीव्र तळमळ आणि साधकांना सेवेच्या माध्यमातून घडवणाऱ्या सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचा चैत्र कृष्ण त्रयोदशी (२८.४.२०२२) या दिवशी ४५ वा वाढदिवस आहे. पू. रत्नमालाताई यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त देवद, पनवेल येथे त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) या संतपदी घोषित झाल्याच्या दिनांकाचे देवाने लक्षात आणून दिलेले वैशिष्ट्य !

गुणरत्नांची माला असलेल्या (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचे संतपद घोषित करण्यासाठी देवाने विचारपूर्वक दिवस निवडला असावा’, असे मला वाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवामध्ये म्हटलेली भजने आणि साधिकेने भजनावर सादर केलेले नृत्य पाहून एका साधिकेला आलेली अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सादर केलेली भजने मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी म्हणत आहे अन् नृत्य करत त्यांना आळवत आहे’, असा भाव मी ठेवत होते.