‘क्षमा वीरस्य भूषणम् ।’ म्हणजे ‘क्षमाशीलता हे वीरांचे आभूषण आहे.’
व्यष्टी स्तरावर कुणी तुमच्यावर काही मानसिक आघात केला किंवा बोलून तुमचा तिरस्कार केला, तर तुम्ही त्याला अवश्य क्षमाच करायला पाहिजे; परंतु समष्टी स्तरावर वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून अत्याचार होत असेल, तर त्याला त्वरित कठोरातील कठोर दंड द्यावा; अन्यथा समाजात अधर्म वाढण्यास वेळ लागणार नाही. याचे उदाहरण पाहूया.
पाकिस्तानच्या दुष्कृत्यांना आपण क्षमा करत चाललो आहोत. त्यातून त्याचे मनोबळ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. चोहोबाजूंना दुष्कर्मे (महिलांवर अत्याचार) होत आहेत. वास्तविक ‘दुष्कर्म करणाऱ्यांना २ दिवसांच्या आत सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारून मृत्यूदंडच दिला पाहिजे’, असे सामाजिक भान आणि उत्तरदायित्वाची जाणीव असलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाटले, तर त्यात नवल ते काय ? असे केल्यानेच वासनांधांची ही कृत्ये त्वरित थांबतील. ‘कोणत्या वेळी कोणत्या गुणाचा अवलंब करावा ?’, हे शास्त्राभ्यासकांना विचारून ते आत्मसात करावे. समाज आणि राष्ट्र यांचे अहित करणाऱ्याला क्षमा करणारा षंढ असतो. असे लोक समाज आणि राष्ट्र यांचे विनाशक असतात, हे लक्षात ठेवावे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२०.३.२०१३)