‘जेवढ्या मोठ्या आवाजात अजान दिली जाईल, तेवढ्याच आवाजात हनुमान चालिसा म्हटली जाईल ! – हिंदवी स्वराज संघटना
आता निधर्मीवादी ‘हिंदवी स्वराज’ संघटनेला ‘धर्मांध’ म्हणून हिणवतील; मात्र ‘अशी घोषणा करण्याची वेळ या संघटनेवर का आली ?’, याचा विचार करण्याचे कष्ट कुणी घेणार नाहीत !
महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार श्री हनुमानाविषयी अश्लाघ्य वक्तव्य करत असलेला व्हिडिओ प्रसारित !
धर्मांध अब्दुल सत्तार यांना अटक करावी, तसेच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने आंदोलन करावे !
शरद पवार आणि राजीव गांधी यांची लकडावाला यांच्यासमवेतची छायाचित्रे प्रसारित !
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युसूफ लकडावाला यांच्या समवेतची छायाचित्रे ‘ट्विटर’वरून प्रसारित केली आहेत.
महाराष्ट्रातील अनेक कारागृहांत बंदीवानांना भ्रमणभाष पुरवणारी यंत्रणा कार्यरत !
जर असे प्रकार घडत असतील, तर ते कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! असे करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
आमदार अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रविष्ट !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिसंवाद मेळाव्यात भाषण करतांना मारुतिस्तोत्राची चेष्टा केली, तसेच ‘कन्यादान’ विधीविषयी जाणूनबुजून बेताल अन् खोटे वक्तव्य केले
भंडारा येथे रेती तस्करांचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर आक्रमण !
तस्करांवर कठोर कारवाई केल्यासच ते पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस करणार नाहीत !
भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी !
भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई येथे बलात्काराचा, तसेच महिलेला धमकवल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटक टाळण्यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता.
हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या ! – योगेश ठाकूर, हिंदु जनजागृती समिती
धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आज देशात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. भारतासह जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडला असल्याने विश्वकल्याणासाठी भारत हिंदु राष्ट्रच होणे हाच एकमेव उपाय आहे.
गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’ची सक्ती होण्याची शक्यता ! – आरोग्यमंत्री
राज्यात तशी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. नवे विषाणू ‘ओमायक्रॉन’चाच भाग आहेत. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही; मात्र आवश्यकता भासल्यास गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’ची सक्ती होऊ शकते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.