कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्याची भारताला संधी द्यावी ! – इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे पाकिस्तान सरकारला निर्देश

जाधव यांच्या शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्‍चित करण्याचे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिले होते.

भागलपूर (बिहार) येथे एका घरात झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू, तर ११ जण घायाळ

फटाके बनवतांना स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती !

महाराष्ट्र : विधानसभेत ६ सहस्र २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात ६ सहस्र २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.

भारतियांना बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध थांबवल्याच्या वृत्ताचे परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन

‘आमच्या विनंतीवरून रशियाने युद्ध थांबवलेले नाही. ‘युद्ध थांबवले’ असे सांगणे म्हणजे ‘आमच्या सांगण्यावरून पुन्हा बाँबफेक चालू होईल कि काय ?’, असे सांगण्यासारखे आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदी प्रदूषणास उत्तरदायी असणार्‍या घटकांवर कारवाई करा ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. या संदर्भात पर्यावरणमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हे आदेश दिले.

कीव येथील गोळीबारात भारतीय विद्यार्थी घायाळ ! – केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह

व्ही.के. सिंह म्हणाले की, हा विद्यार्थी कीवमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्याला पुन्हा शहरात नेऊन रुग्णालयात भरती करण्यात आले.

युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरभाषवरून ९० मिनिटे चर्चा केल्यानंतर ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ अशी चेतावणी दिली.

(म्हणे) ‘एका मृतदेहाऐवजी १० जणांना युक्रेनमधून आणता येईल !

युक्रेनमध्ये युद्धात ठार झालेला कर्नाटक येथील नवीन शेखरप्पा याचा मृतदेह युक्रेनमधून परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र त्या देशात युद्ध चालू आहे, अशा परिस्थितीत त्या लोकांना जिवंत आणणे आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे.

सहारसा (बिहार) येथे दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून चौघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

धर्मांध वासनांध आणि त्यांना पाठीशी घालणारे धर्मांध पोलीस अधिकारी, पंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांच्यावर बिहार सरकार कठोर कारवाई करणार का ?

युक्रेनमध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे नियंत्रण

नीपर नदीच्या किनारी असलेल्या युक्रेनच्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाने आक्रमण करून ते स्वतःच्या नियंत्रणात घेतले आहे. हे केंद्र युरोपमधील सर्वांत मोठे, तर पृथ्वीवरील ९ व्या क्रमांकाचे अणूऊर्जा केंद्र आहे. या अणूऊर्जा प्रकल्पातून युक्रेनला ४० टक्के अणुऊर्जेचा पुरवठा होतो.