प्रयागराज – महाकुंभ-२०२५ च्या सुरक्षाव्यवस्थेत ‘अश्वशक्ती’ नावाचे घोडे तैनात करण्यात आले आहेत. हे घोडे सामान्य नाहीत. त्यांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित करण्यात आले आहे. संकेतांचे पालन करून ते मार्ग काढतात. भूमीवर, तसेच पाण्यातही हे घोडे धावू शकतात. मेळ्यातील गर्दी नियंत्रणासाठी या घोड्यांसमवेत उत्तरप्रदेशचेे ‘ट्रेन माउंटेड’ पोलीस तैनात आहेत. १३० घोडे घेऊन सैनिक वेगवेगळ्या गटात गस्त घालण्यासाठी निघतात. घोडेस्वारांच्या पथकात भारतीय जातीखेरीज अमेरिकी आणि इंग्रजी जातीच्या घोड्यांचाही समावेश आहे. त्यांचे मूल्य ५० लाख ते अडीच कोटी रुपयांपर्यंत आहे.
सर्व घोड्यांच्या गळ्यात एक विशेष उपकरण बसवलेले असते. सध्या माऊंटेड पोलीस सकाळी आणि सायंकाळी घोडे घेऊन गस्तीवर जात आहेत. महाकुंभ चालू होताच २४ घंटे पाळ्यांमध्ये गस्त घालण्यात येणार आहे.