यवतमाळ बसस्थानकातील पोलीस चौकीची भरदिवसा तोडफोड !

यवतमाळ, ८ जानेवारी (वार्ता.) – येथील बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीची  एका मद्यधुंदाने भरदिवसा तोडफोड केली. बसस्थानकाचा हा परिसर कायम असुरक्षित असल्याने तेथे पोलीस चौकी उभारण्यात आली होती. पोलीस चौकीच्या बाजूला एस्.टी. पार्सल कार्यालय आहे. मद्यधुंद व्यक्तीने त्यातील संगणक, तसेच अन्य साहित्य आणि कपाट यांची तोडफोड केली. या वेळी तेथील कार्यालयात एकही कर्मचारी कार्यालयात नव्हता.

संपादकीय भूमिका

जनतेची सुरक्षा करणार्‍यांच्या स्थळाची अशी स्थिती होत असेल, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?