फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) : येथे मुसलमानबहुल भागात गेल्या ३० वर्षांपासून बंद असणारे शिवमंदिर सापडले आहे. मंदिराची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथे स्वच्छता केली. तसेच हनुमान चालिसाचे पठण केले. त्यापूर्वी प्रशासनाने मंदिराचे कुलूप उघडले. या काळात कोणताही विरोध झाला नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की, पूर्वी एक हिंदु कुटुंब या परिसरात रहात होते. त्यांनीच हे मंदिर बांधले होते; परंतु ते स्थलांतरित झाले आहे. शहर दंडाधिकारी राजेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे ६० वर्षे जुने आहे. हे वर्ष १९६३ मध्ये बांधले गेले.
स्थानिक हिंदूंनी मंदिर उघडण्याला त्यांचे धार्मिक अधिकार परत मिळाल्याचे वर्णन केले आहे. या ठिकाणी लवकरच मूर्ती स्थापन करण्यात येईल, असे हिंदु संघटनेशी संबंधित सदस्यांनी घोषित केले.Firojabad