‘इस्रो’च्या प्रमुखपदी व्ही. नारायणन् यांची नियुक्ती !

डॉ. व्ही. नारायणन्

मुंबई – ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजे ‘इस्रो’च्या प्रमुखपदी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. व्ही. नारायणन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १४ जानेवारीपासून सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन् सध्या ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर’चे संचालक आहेत. अनुमाने ४ दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी ‘इस्रो’मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन् हे ‘रॉकेट’ आणि ‘स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन’मध्ये पारंगत आहेत.