उज्जैनमधील हॉटेलमधून केली अटक !
उज्जैन (मध्यप्रदेश) – येथून लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथेे बनावट हिंदु ओळखपत्राच्या आधारे हॉटेलमध्ये थांबलेल्या सैफ अहमद नावाच्या मुसलमान तरुणाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. हॉटेलमध्ये त्याच्यासमवेत एक हिंदु तरुणीही आढळली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार उज्जैनमधील महाकाल मंदिराजवळील एकलव्य हॉटेलमध्ये एक मुसलमान तरुण हिंदु नावाने रहात असल्याची माहिती तेथील हिंदु संघटनांना मिळाली. हिंदु संघटनेचे सदस्य हॉटेलमध्ये पोचले. तेथील नोंदवही तपासली असता प्रकाशकुमार गुप्ता नावाची एक व्यक्ती हिंदु मुलीसमवेत रहात असल्याचे आढळून आले. त्यांना संशय आला. त्यांनी प्रकाशकुमार याला बाहेर बोलावून चौकशी केली असता त्याचे खरे नाव सैफ अहमद असल्याचे समोर आले.
सैफ हा छत्तीसगडमधील भिलाईचा रहिवासी आहे. त्याच्यासमवेत सापडलेली तरुणीही भिलाई येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. सैफ अहमदविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बी.एन्.एस्.च्या) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैफने हिंदु असल्याचे आपल्याला खोटेच सांगितले, असे पीडित तरुणीने सांगितले. सैफने हिंदु तरुणीला महाकालच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने उज्जैनला आणल्याचा आरोप हिंदु कार्यकर्त्यांनी केला आहे.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा असतांनाही राज्यातून वरचेवर लव्ह जिहादच्या घटना समोर येत आहेत. यातून या लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच लक्षात येते ! अशांना सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करणे त्यामुळे आवश्यक झाले आहे ! |