ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध हिलसाँग चर्चचे संस्थापक आणि प्रमुख ब्रायन हाऊस्टन यांना अश्‍लील वर्तनामुळे पदावरून हटवले !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतीय प्रसारमाध्यमे अशा बातम्या दडपतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

ब्रायन हाऊस्टन

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – दोन महिलांशी अश्‍लील वर्तन केल्याच्या आरोपावरून ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध हिलसाँग चर्चचे संस्थापक आणि प्रमुख ब्रायन हाऊस्टन (वय ६८ वर्षे) यांना पदावरून हटवण्यात आले आहे. अंतर्गत चौकशीमध्ये या आरोपात तथ्य  आढल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ‘ब्रायन यांच्या वडिलांनी १९७० च्या दशकात केलेले लैंगिक अत्याचार लपवले’, असाही आरोप त्यांच्यावर आहे.

या चर्चची स्थापन ब्रायन यांनी त्यांची पत्नी बॉबी यांच्या समवेत केली होती. या चर्चच्या शाखा युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातही आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी वर्ष २०१९ मध्ये या चर्चमध्ये येऊन प्रार्थनाही केली होती.