रशियाची युक्रेनवरील सैनिकी कारवाई ‘नाटो’साठी ‘विद्युत् झटका’ !

वर्ष २०१९ मध्ये मॅक्रॉन यांनी ‘नाटो’ला ‘मृत झालेली संघटना’ असे संबोधले होते. मॅक्रॉन यांनी मी पूर्ण विचार करून हे वक्तव्य केले आहे. रशियाच्या कारवाईतून ‘नाटो’ने जागृत होणे आवश्यक आहे, असेही मॅक्रॉन म्हणाले.

चीनने रशियाला सैनिकी साहाय्य केले, तर चीनवर कारवाई करण्यास मागे-पुढे पहाणार नाही ! – अमेरिकेची चीनला चेतावणी

युक्रेनसमवेतच्या युद्धात चीन सैनिकी उपकरणांच्या माध्यमातून रशियाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाला पाठिंबा देणार्‍या कोणत्याही कृतीला चीन उत्तरदायी असेल.

उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या डॉ. यास्मीन राव यांच्याकडून त्यांचे पती अरशद राणा यांच्यासह ४ जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप

‘जर मला न्याय मिळाला नाही, तर मी गळफास घेऊन आत्महत्या करीन’, अशी चेतावणीही डॉ. यास्मीन यांनी दिली आहे.

रशिया-युक्रेन युद्धातून बोध घेऊन हिंदु युवक-युवतींनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

काँग्रेसच्या पापांचा पाढा वाचता हिंदूंनी या पक्षाला इतिहासजमा करणे अपरिहार्य आहे, हेच लक्षात येते ! केंद्र सरकारने या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमी परत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले ‘पेनड्राईव्ह’ पुष्कळ पाहिले, योग्य वेळी ध्वनीचित्र चकती बाहेर काढणार ! – एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

यापूर्वी खडसे यांनी ‘माझ्यामागे ‘ईडी’ लावली, तर मी ‘सीडी’ लावीन’, अशी चेतावणी भाजपच्या नेत्यांना दिली होती. 

राज्यातील पथविक्रेत्यांचे जागावाटप प्रलंबित, सर्वेक्षण पूर्ण करायला लागणार आणखी ६ मास !

मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पथविक्रेत्यांमुळे सर्वसामान्यांना रस्त्यांवरून चालणेही जिकरीचे झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी सरकारने ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी !

‘तुम्हाला चौकशी करायची, तर खुशाल करा आणि १ मासात निकाल लावा !’ – चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजप

भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपट करमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदु बांधवांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण घोषित करण्यात आले होते.

खडकवासला येथील ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी !

धूलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ, प्रशासन आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवली जाते.