हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे – युद्धाच्या कथांमधून बोध घेणे आणि त्यानुसार कृती करणे, ही काळाची आवश्यकता आहे. रशिया आणि युक्रेन येथील सीमावर्ती भागात भारतीय विद्यार्थ्यांविषयी घडलेल्या घटनेतून हिंदु युवक-युवतींनी बोध घेऊन येणार्या काळामध्ये स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीचे सूत्रसंचालन आणि बैठकीचा उद्देश सौ. शीतल स्वामी यांनी स्पष्ट केला.
समितीच्या कु. चारुशीला चिंचकर यांनी उपस्थित युवतींना ७ दिवसांच्या शौर्यजागृती वर्गात ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्यक्षातही ७ दिवसांचा शौर्यवर्ग चालू करण्याचे नियोजन केले आहे, तसेच प्रत्यक्ष वर्ग चालू करण्याविषयी मागणी आली आहे.
या बैठकीच्या आयोजन सेवेचे दायित्व धर्मप्रेमी कु. सोनाली देवकर यांनी घेतले होते, तर बैठकीचे नियोजन धर्मप्रेमी कु. स्नेहल मुळुख, सौ. भाग्यश्री बाबर आणि सौ. ज्योती जाधव यांनी केले.
अभिप्राय
१. श्री. प्रशांत भुजबळ – प्रशिक्षणवर्ग प्रत्यक्ष हवा आहे, तसेच शौर्यवर्गातही सहभागी होईल.
२. सौ. सविता – मार्गदर्शन ऐकून पुष्कळ छान वाटले. स्वरक्षण शिकणे काळाची आवश्यकता आहे. याचे महत्त्व समजल्यामुळे ‘मीही हे प्रशिक्षण घेणार आहे.’