मुंबई – आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते. माझेही तशाच प्रकारे संबंध जोडले गेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेली ‘सीडी’ आणि ‘पेनड्राईव्ह’ पुष्कळ पाहिले आहेत. त्यामुळे त्याच्यातील तथ्य चौकशीअंतीच बाहेर येईल. योग्य वेळ आल्यानंतर त्यांची (भाजप नेत्यांची) ध्वनीचित्र चकती (सीडी) बाहेर काढणार आहे, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी १६ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली. यापूर्वी खडसे यांनी ‘माझ्यामागे ‘ईडी’ लावली, तर मी ‘सीडी’ लावीन’, अशी चेतावणी भाजपच्या नेत्यांना दिली होती.