कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आक्रमणकर्ते नेमके कोण आहेत ?, हे अन्वेषण यंत्रणेने अगोदर निश्चित करावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी कोल्हापूर येथील न्यायालयात युक्तीवाद

प्रतिदिन अग्निहोत्र केल्याने ईश्वरीय ऊर्जेचे संरक्षककवच निर्माण होते ! – मनीष माळी, हिंदु जनजागृती समिती

‘अग्निहोत्र’ ही प्राचीन काळापासून वातावरणशुद्धीसाठी ऋषींनी दिलेली देणगी आहे. अग्निहोत्र कर्मबंधनमुक्त यज्ञ असल्याने ते कुणीही करू शकते. अग्निहोत्र करतांना प्रजापती आणि सूर्य यांच्या तेजाचे संरक्षककवच निर्माण होऊन सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते.

माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण शक्य ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्माचरण करून भारतीय परंपरेचा सार्थ अभिमान बाळगा ! जी स्त्री धर्मशिक्षित होईल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही.

धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या आरक्षणाच्या सवलती रोखण्यासाठी समिती नियुक्त करून निर्णय घेणार ! – के.सी. पाडवी, आदिवासी विकासमंत्री

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘राज्यात हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे.’’

भिवंडी (ठाणे) येथील चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ बंद पाडल्याची चौकशी करावी ! – राम कदम, आमदार, भाजप

‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याची भाजपच्या आमदारांची विधानसभेत पुन्हा जोरदार मागणी ! ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्याविषयी सरकारची उदासीनता !

नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

मलिक यांनी केलेल्या या याचिकेला विरोध करत ‘ईडी’ने त्यांच्याविरोधातील कारवाई आणि त्यांची अटक आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्याला अनुसरूनच असल्याचा दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.

राज्यातील शेतकर्‍यांची ३ मास वीज तोडणार नाही ! – ऊर्जामंत्री

शेतकर्‍यांचे हित आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आगामी ३ मासांसाठी शेतकर्‍यांची वीज तोडण्यात येणार नाही, तसेच ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात येईल.

रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’ चित्रपटावर बंदी; मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !

हिजाबप्रेमींना दणका !

यातून बोध घ्यायचा म्हणजे जसजसे हिंदूंचे संघटन वाढत आहे, हिंदू जागृत होत आहेत, तसतसे हिंदुविरोधी अधिक सतर्क होऊन काही ना काही निमित्त काढून धर्मांध कारवाया करत आहेत. न्यायालयही सत्य स्थिती पुढे आणत आहे. हिंदूंनीही संघटितपणे वैध मार्गाने वैचारिक प्रतिवाद करत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत संघर्ष करत राहिले पाहिजे !