सर्वोच्च न्यायालयाचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (मी गांधी यांना का मारले) चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार

नवी देहली – मोहनदास गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजे ३० जानेवारीला  ‘ओटीटी’ मंचावर प्रदर्शित झालेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’  या चित्रपटाच्या प्रसारणाला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

न्यायालयाने म्हटले आहे की, कलम ३२ अंतर्गत याचिका तेव्हाच प्रविष्ट केली जाऊ शकते, जेव्हा मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाचा प्रश्न असेल. याचिकाकर्त्याच्या कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले गेलेले दिसत नाही. याचिकाकर्त्याला कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार नाही.