जगभरात प्रवास करण्यायोग्य ११८ देशांच्या सूचीमध्ये भारताचा दहावा क्रमांक !

नवी देहली – जगभरात प्रवास करण्यायोग्य ११८ देशांच्या सूचीमध्ये भारताने दहावा क्रमांक पटकावला आहे. भारताच्या खाली फ्रान्स, जर्मनी, जपान, तुर्कस्तान आणि स्पेन यांसारख्या देशांचा क्रमांक लागला आहे. हे सर्व देश पर्यटनासाठी लोकप्रिय मानले जातात; मात्र त्यांना मागे टाकत भारताने या सूचीमध्ये सरस कामगिरी केली आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जर रस्त्याच्या मार्गाने प्रवास करायचा असेल, तर कुठला देश सर्वार्थाने उत्तम ठरेल, या निकषावर ही सूची सिद्ध करण्यात आली आहे. त्यात देशातील रस्ते, पर्यटन स्थळे, नैसर्गिक ठिकाणे, महागाई अशा अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला होता. अमेरिका, मेक्सिको, कॅनडा आणि मलेशिया या देशांनी प्रवासासाठी उत्कृष्ट असणार्‍या देशांच्या सूचीमध्ये वरचे स्थान पटकावले आहे.