मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी शिवसेनेच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे !

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेनेच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालून अभिषेक करण्यात आला.

नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात ‘प्राणी सवारी’ विकसित करण्याचा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प !

प्राण्यांच्या सवारीसाठी दुबईचा दौरा करण्याचा वनविभागाचा शासनाकडे प्रस्ताव

वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी पुण्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या ७ धाडी !

वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात ११ नोव्हेंबर या दिवशी एकूण ७ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पुण्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठी साहित्य संमेलनाच्या गीतात केला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख !

संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्मिती करण्यात आलेल्या या गीतात ‘इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असतांना सावरकरांचे नाव का नाही ?’, असा प्रश्न सावरकरप्रेमींनी व्यक्त केला होता.

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित १४ नोव्हेंबर या दिवशी ‘मेळा गोभक्तांचा’ कार्यक्रम !

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालू !

दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘ऑफलाईन’ चालू झाले आहेत.

देवतांचे विडंबन करणार्‍या प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने !

प्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर बंदी आणणे हेच खरे राष्ट्ररक्षण ठरेल, हे सर्वांनी लक्षात घ्यावे !

‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल २४ घंट्यांत मिळण्याच्या शासनाच्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार उघड !

राज्यातील कोरोना चाचण्यांच्या संदर्भात ‘२४ घंट्यांत कोरोनाचा अहवाल’ असे शासनाचे धोरण असूनसुद्धा त्याला शासकीय रुग्णालयांकडूनच हरताळ फासला जात आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ !

आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत.

‘लाल परी’ रुसली !

महामंडळाला तोटा होऊ लागला, तेव्हापासूनच सावध होऊन ठोस उपाययोजना काढून त्याला वर काढले असते, तर आज ही वेळ आली नसती. सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या वाहतूक यंत्रणेची जोपासना झाली असती, तर ही वेळ आली नसती.