विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित १४ नोव्हेंबर या दिवशी ‘मेळा गोभक्तांचा’ कार्यक्रम !

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने आयोजित ‘मेळा गोभक्तांचा’

पुणे – विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने १४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी ‘मेळा गोभक्तांचा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ‘आदर्श गोभक्त’, ‘आदर्श गोपालक’, ‘आदर्श गोशाळा चालक’, ‘आदर्श गोरक्षक’ असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या कार्यक्रमाला ‘कोहिनूर ग्रुप’चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल, साध्वी प्रीती सुधाजी महाराज आणि स्वरसम्राज्ञी मधुस्मिताजी, धर्माचार्य शंतनु रिठे महाराज आणि आत्मनिर्भर भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख माधव भांडारी, विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकररावजी गायकर या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाला पांजरापोळ भोसरी, महाएन्जीओ फेडरेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, ‘इस्कॉन’ पुणे, पतंजलीची महाराष्ट्र गोविज्ञान संशोधन संस्था, राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद आणि अन्य सामाजिक संस्था, तसेच संघटना सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख माधव कुलकर्णी, विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि गोभक्त मेळाव्याचे आयोजक महेंद्र देवी आणि विश्व हिंदु परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतमंत्री संजय मुद्राळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

गोभक्तांचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा !

दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१

 वेळ : दुपारी ४ वाजता

स्थळ : लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, पुणे